पोलिओ निर्मूलन पथकावरील गोळीबारात पोलिस ठार   

बलुचिस्तानातील घटना

कराची  : पाकिस्तानातील बलुचिस्तानात एका: पोलिओ निर्मूलन पथकावर मंगळवारी गोळीबार झाला. त्यात पथकची सुरक्षा करणारा एक पोलिस कर्मचारी ठार झाला. अब्दुल वाहीद, असे पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. त्याचा मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिओ निर्मूलन पथकातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत, अशी महिती अधिकार्‍यांनी दिली.हल्ल्याचा निषेध अध्यक्ष असीफ अली झरदारी, बलुचिस्तान प्रांताच्या प्रशासनाने आणि सरकारी अधिकार्‍यांनी केला आहे. पाकिस्तानातून पोलिओ निर्मूलनाची मोहीम राबविली जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही.

Related Articles